रत्नागिरी : तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी तसेच नाखरे कालकरकोंड येथे सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्या संशयितांवर पूर्णगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन केले जात असल्याची गोपनीय माहिती पूर्णगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली. वायंगणी समुद्रकिनारी स्मशानभूमी येथे करण्यात आलेल्या कारवाईत सैफ वाहिद शेख (२०), नवमान मेहबुब जांभारकर (१९), इफाम मोहसिन शहा (१९, रा. तिघेही किर्तीनगर रत्नागिरी) व आरिफ इम्तियाज खलिफे (२०, रा. नाचणे रोड, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर नाखरे कालकरकोंड येथे रस्त्याकडेला आंब्याच्या झाडाखाली दारु पिण्यासाठी बसलेल्या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये संतोष शंकर धाटकर (५३), राजेंद्र पांडुरंग कालकर (३६) व सुरेश दत्ताराम कालकर (४०, रा. तिघेही नाखरे कालकरकोंड रत्नागिरी). अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 02/May/2025














