खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे जाधववाडीजवळ शुक्रवारी (दि. २मे) सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात पाच वर्षाच्या मुलासह बंडबे कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत.
मुंबईहून राजापूरकडे जाणारी रिक्षा भरधाव असताना चालकाला झोप आल्याने त्याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये शिवांश सुभाष बंडवे (वय ५), संगीता भिकू बंडबे (वय ६५), भिकू बापू बंडबे (७५) आणि सुभाष भिकू बंडबे (३४) हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे संस्थापक प्रसाद गांधी व हेमंत पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 03/May/2025














