रत्नागिरी : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी, निवृत्त वेतन व इतर मागण्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात आले. शासनाने मागण्यांचा तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या गेटवर यासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले, प्रशासनाला मागण्यांसंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ग्रामपचांयतीमध्ये सफाई कामगार, पाणी पुरवठा कामगार, वीज पुरवठा कामगार, कर वसुली कर्मचारी, लिपिक आदी पदावर कामगार सेवेत आहेत. सर्व ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी बरेचदा आंदोलन, मेळावे, मोर्चे, अधिवेशन केली आहेत.

मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री व बरेचसे आमदार आंदोलनात, मोर्चास व अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासने दिलेली आहेत. बरेचवेळा प्रशासकीय बैठका झाल्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या असलेल्या प्रलंबित मागण्या शासनाकडून मंजूर करुन मिळाव्यात यासाठी दोन दिवस कामबंद आंदोलन करण्यात आले, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे शंकर कांबळे, कृष्णा होडे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 03/May/2025