मुंबई : राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील (ओबीसी) १९ जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मान्यता दिली आहे.
राज्य सूचीतील क. २२० मध्ये अंतर्भाव असलेल्या बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर व रेवा गुजर, तसेच राज्य सूचीच्या क. २१६ मधील पोवार, भोयर आणि पवार, राज्य सूचीतील क. १८९ मधील कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या बेलदार जातीच्या उपजातींचा आणि राज्य सूचीतील क. २६२ अंतर्गत असलेल्या लोध, लोधा व लोधी आणि क. २६३ मध्ये समावेश असलेल्या डांगरी या जातीचा समावेश आता केंद्रीय सूचीमध्ये होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 10-10-2024