खेड : आंबडस सोलकरवाडी पुलाजवळ अज्ञाताचा मृतदेह

खेड : तालुक्यातील आंबडस येथील सोलकरवाडी पुलाच्या जंगलात ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह कुजलेल्या व अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहावर किडे पडलेले असून, त्यातून दुर्गंधी सुटत होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रात्री १० वाजून ५ मिनिटांनी हा प्रकार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. मृताची ओळख पटील असून मनोहर जयसिंग तावडे (३५), रा. पाळी, खालचीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस करत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 05/May/2025