राज्य माध्यमिक बोर्डाचे परीक्षा शुल्क १० टक्क्यांनी वाढले

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्क्यांची वाढ करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना यंदा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत परीक्षा शुल्कवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. या चर्चेनंतर निर्णय घेत फक्त परीक्षा शुल्कात वाढ झाली. इतर शुल्कांमध्ये जसे प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क व प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केला नाही. यामध्ये प्रत्येक प्रकारासाठी २० रुपये शुल्क कायम आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळणाऱ्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात. यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क देखील विद्यार्थ्यांकडूनच घेतले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 05-05-2025

Swami swaru. Pat.