रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील कामांचा आ. किरण सामंत यांनी घेतला आढावा

रत्नागिरी : एमआयडीसीच्या माध्यमातून कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म व अन्य सुविधांचा कायपालट केला जात असून या सर्व कामांचे लांजा-राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांच्या प्रगतीबाबत ठेकेदार आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

आ. किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सोमवारी दुपारी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जात कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संपूर्ण रत्नागिरी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. राज्याच्या बांधकाम विभागाकडून रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या बाहय भागाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. आकर्षक असे रेल्वे स्थानक दिसत आहे. यानंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म व अन्य कामांसाठी सुमारे ३० कोर्टीचा निधी एमआयडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला आहे.

संपूर्ण प्लॅटफॉर्मवर पत्र्याचे अच्छादन केले जाणार आहे. नवीन लिफ्टसह अन्य विविध कामे केली जाणार असून, विमानतळाप्रमाणे आकर्षक असे रेल्वे प्लॅटफॉर्म असणार आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रवाशांना सामान घेऊन कसरत करीत स्थानकावर यावे लागते, नागरिकांच्या सोयीसाठी सूचना केल्या. यावेळी ठेकेदार कंपनी ज्ञातीच्या अधिकाऱ्यांसह रेल्वेचे रत्नागिरी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. काही ठिकाणी कामांची गती कमी असल्याबद्दल आ. किरण सामंत यांनी नाराजी व्यक्त करीत, कामे वेगाने पूर्ण कशी होतील यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट, प्रांताधिकारी जीवन देसाई, माजी शिक्षण सभापती विलास चाळके, शिवसेना शहरप्रमुख विपीन बंदरकर यांच्यासह पदाधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 06/May/2025