संगमेश्वर : माखजन ग्रामपंचायतीतर्फे १५ व्या वित्त आयोगातून विविध वस्तूंचे वाटप

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायती १५ व्या वित्तआयोगा मधून विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात गावातील आशा सेविकांना रेकॉर्ड जतन करण्यासाठी कपाट, वजन काटा देण्यात आला.

बचतगटातील महिलांसाठी पापड मशीन, अंगणवाडी तील मुलांसाठी सतरंजी, मॅट व इतर जेवणासाठी लागणारी भांडी आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच महेश बाष्टे अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अंगणवाडी, महिला बचत गट, आशा सेविका यांना रोज लागणाऱ्या वस्तू ग्रामपंचायतीने दिल्यामुळे ग्रा. पं. चे आभार व्यक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 06/May/2025