आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा : डॉ. शिवाजी सरगर

रत्नागिरी: ई कन्टेंट बनविणे आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती सोडून आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी केले.

रत्नागिरी शहरातील जोगळेकर शास्त्र गोगटे महाविद्यालयातील शाखेतर्फे पीएम उषाअंतर्गत प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेत मुक्स, ई- कन्टेंट तयार करणे, ऑनलाइन वेगवेगळे प्लॅटफॉर्म यासंबंधी प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. शिवाजी सरगर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, अजित पाटील, प्रा. अजित देशमुख उपस्थित होते.

यावेळी प्रा. पंक्ती सुर्वे, अजित पाटील, प्रा. अजिता देशमुख, प्रा. डॉ. बालाजी, डॉ. श्रीनिवास यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. डॉ. शिवाजी उकरंडे व प्रा. उमा जोशी यांनी प्रातिनिधिक मनोगत केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व प्राध्यापकांना मुक्स बनविण्यासाठी, पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रेरित केले. डॉ. मेघना म्हादये यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. अनुजा घारपुरे, प्रा. रश्मी भावे, प्रा. सचिन सावले, प्रा. निशा केळकर यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 06/May/2025