रत्नागिरी : ज्या विभागाकडे प्रलंबित अर्ज आहेत, ते तत्काळ मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जाचाही आढावा घेतला. नव्याने ५ अर्ज दाखल झाले आहेत. संबंधित विभागाने मागील प्रलंबित अर्जासह याची निर्गती करावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 07/May/2025














