चिपळूण : रामपुरमध्ये १० तास वीजपुरवठा खंडित

रामपूर : महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत कंपनी शाखा मार्गताम्हाणे यांच्या अंतर्गत ५ मे रोजी सकाळी ८ वा. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. सायंकाळी ६ वा. परिसरातील वीज पुरवठा सुरळीत झाला. तब्बल १० तास परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले. वीज नसल्याने बँक, पोस्ट ऑफीस व अन्य कामे होऊ शकली नाहीत.

गावागावातून आलेल्या ग्राहकांना पुन्हा परत जावे लागले. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. रामपूर परिसरातील सुमारे तीस गावांमध्ये अद्यापही मार्च, एप्रिल महिन्याची वीज बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे वीज बिले वेळेत मिळावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 07/May/2025