पाकिस्तानवरील कारवाईचा चिपळूण भाजपतर्फे जल्लोष

चिपळूण : पाकिस्तानात अतिरेकी ठिकाणांवर भारतीय सैन्याने सिंदूर ऑपरेशनद्वारे हल्ला करण्यात आला. याबाबत छत्रपती शिवाजी चौक चिपळूण येथे चिपळूण भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ७) आनंद व्यक्त केला.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी तालुका समन्वयक विनोद भुरण, शहर समन्वयक शशिकांत मोदी, रामदास राणे, आशिष खातू, रत्नदीप देवळेकर, अनिल सावर्डेकर, मधुकर निमकर, वैशाली निमकर, विनायक वरवडेकर, ओंकार बापट, स्वानंद रानडे, प्रणाली सावर्डेकर, अभिषेक राजापूरकर, अमित चिपळूणकर, मंदार कदम, निखिल किल्लेकर, प्रसाद वरेकर, मंगेश चिले, शक्ती चव्हाण उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 08/May/2025