रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या चालक, वाहक, चालक कम वाहकांसाठी गणवेश, नेमप्लेट, बॅज (बिल्ला) बंधनकारक तर केला आहे. शिवाय ओळखपत्र दररोज ड्युटीवर असतना परिधान करणे सक्तीचे केले आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईची सूचना करण्यात आली आहे.
एसटीच्या चालक, वाहकांनी कर्तव्यावर असताना मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार गणवेश धारण करूनच कामगिरी बजावणे आवश्यक आहे. मात्र, काही कर्मचारी गणवेश परिधान करण्याकडे दुर्लक्ष करतात. गणवेश परिधान करत नसल्यामुळे नेमप्लेट, बॅजसुद्धा लावत नाहीत. त्यामुळे महामंडळाने गणवेशासह नेमप्लेट, बॅज तर सक्तीचा केला आहे.
शिवाय चालक-वाहकांनी ड्युटीवर असताना ओळखपत्र परिधान करणे सक्तीचे आहे. जेणेकरून एखाद्यावेळी चालक / वाहकांकडून गैरवर्तन झाल्यास प्रवाशांना त्यांच्याविरोधात तक्रार करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक आगार व्यवस्थापकांना चालक, वाहकांना गणवेश, नेमप्लेट, बॅज, ओळखपत्र घालूनच कर्तव्यावर येण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन केले आहे.
१० वर्षांपासूनची मागणी
एसटीचे चालक, वाहकाची ओळखपत्र मागणी जुनी असून त्यांना ते वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे.
दंडात्मक कारवाई
कर्मचाऱ्यांना गणवेश नेमप्लेट, बॅज लावण्यासह ओळखपत्र लावण्याची सूचना करण्यात आली आहे. काही जण प्रामाणिकपणे सूचनेचे पालन कतात. मात्र, काही चालक, वाहक दुर्लक्ष करत असल्याने कारवाई केली जाणार आहे.
कमी पगार घ्यायचा
गेले काही महिने एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला महामंडळाकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. कर्तव्यावर असताना काही कर्मचारी ओळखपत्र वापरत नाहीत. यापुढे जे कर्मचारी ओळखपत्र वापरणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई होईल. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक
कार्ड मिळणार; नेमप्लेट
चालक, वाहकांना ओळखपत्र तसेच नेमप्लेटही दिली जात आहे. यापुढे त्याचा वापर सक्तीचा केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 08/May/2025














