शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्जाला मुदतवाढ

रत्नागिरी : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत दि. १० मेपर्यंत देण्यात आली होती.

मात्र, त्याबाबत आलेल्या सूचना आणि अपेक्षा लक्षात घेऊन आता ती मुदत वाढवून दि. १४ मेपर्यंत करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदतही दि. १४ मे रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. या बदलाची नोंद घेत संबंधित विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:48 PM 09/May/2025