चिपळूण : चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ उपसा सुरू आहे. मात्र, शिवनदीतील गाळ पुन्हा नदीतच टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्धवसेनेच्या युवा सेनेचे शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांनी हे उघड करताच विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व शिवसैनिकांनी गुरुवारी पाटबंधारे विभागावर धडक देत अधिकाऱ्यांना खडसावले.
जलसंपदा विभागामार्फत चिपळूण शहर परिसरात वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ उपशाचे काम सुरू आहे. मात्र शिवनदीतील गाळ पुन्हा नदीतच टाकला जात असल्याने उद्धवसेनेने संताप व्यक्त केला आहे. गुरुवारी पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागावर धडक दिली. सूचना देऊनही उपविभागीय अधिकारी विपुल खोत कार्यालयात हजर नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. सहायक अभियंत्यांशी चर्चा करताना गाळ काढण्याच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, हे स्पष्ट केले. कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांची अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
गाळ काढण्याच्या नावावर शासनाच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी उपशहरप्रमुख भैय्या कदम, सचिव प्रशांत मुळ्ये, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, संतोष पवार, संजय रेडीज, राहुल गुरव, रियान मालदार, संजय गोताड, मनोज पांचाळ, संदेश किंजळकर, आकाश कदम, मयूर फटकुरे, नितेश चिपळूणकर, सचिन चोरगे, चेतन कदम उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 09/May/2025














