महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून महिलांनी शोधल्या रोजगाराच्या वाटा

मंडणगड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ज्याला उमेद अभियान म्हणून ओळखले जाते, ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत असले हे अभियान ग्रामीण भागात अत्यंत यशस्वी होताना दिसत आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळताना दिसते.

मात्र गटांच्या उत्पादकांना ग्रामीण ठिकाणी बाजारपेठेच्या अभावी उत्पादन विक्रीस येणाऱ्या अडचणींवर बाजारपेठ संलग्नता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी काम होणे अपेक्षित आहे, की ज्यामुळे हे अभियान महिला सक्षमीकरणाच्या मूळ उद्देशांपर्यंत यशस्वी होऊ शकते.

ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे महिला कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने रोजगारात एक पाऊल पुढे टाकत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरु करत अर्थकारणासाठी रोजगाराच्या वाटा शोधत आहेत. उमेदमुळे हा आमूलाग्र बदल ग्रामीण भागात दिसत आहे.

ग्रामसंघ आणि प्रभागसंघ यांसारख्या स्थानिक संस्था उमेदअंतर्गत निर्माण केल्या आहेत, उमेद अभियानांतर्गत महिलांना स्वयंसहाय्यता गटांमध्ये संघटित केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १५ हजार स्वयंसहाय्यता बचत गट सद्या कार्यरत आहेत.

बचत समूहांच्या माध्यामतून महिलांनी विविध व्यवसाय उभे केले आहेत. जसे की, शेती, शेतीपूरक व्यवसाय, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, हस्तकला, पापड, लोणचे आदी व्यवसायांमध्ये आघाडी घेतली आहे. बचत समूहांनी उत्पादित केलेल्या उत्पादन विक्रीसाठी उमेद अंतर्गत गणपतीपुळे येथे सरस सारखे प्रदर्शन भरवले जाते. यावर्षीपासून दापोली शहरात ‘सरस’ प्रदर्शन भरवून उत्तर रत्नागिरीतील स्वयंसहाय्यता समूहांसाठी उत्पादन विक्रीचे नवे दालन सुरु करण्यात आले आहे.

तालुकास्तरावर शासनाकडून उत्पादन विक्री केंद्रांची निर्मिती करण्यात यावी, यासाठी बचत समूहांच्या महिला आग्रही आहेत.

स्वयंसहाय्यता समूहांना आता उत्पादन विक्री करण्यासाठी हक्काची बाजारपेट हवी आहे. पर्यटन व्यवसायाकरिता उमेदच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही प्रभात संघाच्या हाऊस बोट आहेत, त्याद्वारे पर्यटक जलपर्यटनाचा आनंद घेताना दिसतात. काही प्रभातसंघांकडे टुरिस्ट बसदेखील बचत गटांद्वारे महिलांनी सुरू केलेले या माध्यमातून महिला संघटित झाल्या आहेत. त्यांना तंत्रकुशल बनवून त्यांच्या रोजगार क्षमतेचा वापर करुन घेण्यासाठी शासनाने धोरण निश्चित करणे गरजेचे आहे, अनुषंगाने प्रशिक्षण बाजारपेठेची संलग्नता, डिजिटल मार्केटिंग यावावत कार्यवाही आवश्यक आहे. महिला आज कुटुंबाचा आधार बनू पाहत आहेत, त्यांना बळ देणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 12/May/2025