रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील झाडगाव एमआयडीसी लगतच्या कांदळवनावर घाला घातला जात आहे. झाडगाव एमआयडीसीतील खाडीलगतच्या रस्त्याच्या बाजूला दिवसेंदिवस वाळू खडी तसेच कचऱ्यांची भर टाकण्यात येत असून, अशा जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम केलेले दिसून येत आहे. तसेच माडांची लागवड करण्यात आली आहे. याबाबत नगर परिषदसह वन विभागाचेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
रत्नागिरी शहरातील झाडगाव झोपडपट्टीजवळ असलेल्या मोरी लगतही अशाच प्रकारे खाडीत भराव टाकला जात आहे. कालांतराने या ठिकाणी बांधकाम करण्याची तयारी संबंधितांकडून करण्यात आलेली आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे नगर परिषद प्रशासन पद्धतशीरपणे डोळेझाक करताना दिसून येत आहे. नव नियुक्त मुख्याधिकारी या कडे लक्ष देतील, अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 12/May/2025














