Breaking : SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के

SSC Result 2025 Maharashtra Board Out : इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून राज्याचा एकूण निकाल टक्के 94.10 लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (10th Result) अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तर दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना आज निकाल पाहता येणार आहे.

नागपूर विभागामध्ये 679 केंद्रावरून 1 लाख 51 हजार 379 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तर सर्वाधिक विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील होते. तेथून 58 हजार 495 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 12 वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यभरातील इयत्ता 10 विच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं, आता दहावीच्या निकालात कोण आघाडीवर राहते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

कुठे पाहाल निकाल?

Radhakrushna patapedhi

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

https://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो करा

१. सगळ्यात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.

२. वेबसाइटच्या होमपेजवर, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.

३. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्ही तुमचे लॉगिन डिटेल्स (नाव, हॉल तिकीट क्रमांक ) भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

४. यामुळे तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पाहू शकता.

५. सगळी माहिती बरोबर आहेत का ते तपासा.

६. निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं

दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. दहावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली.

मागील पाच वर्षांमधीय दहावीच्या निकालाचा आढावा

गेल्या पाच वर्षांमध्ये कसा होता इयत्ता दहावीचा निकाल कसा होता?

2024: 95.81
2023: 93.83
2022: 96.94
2021: 99.95
2020: 95.3

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 13-05-2025