डी. जे. सामंत इंग्लिश मीडियमच्या ईश्वरी शिंदेला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

पाली : तालुक्यातील डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, पालीची विद्यार्थिनी ईश्वरी सचिन शिंदे हिने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. ईश्वरीने नुकत्याच नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत हे देदीप्यमान यश मिळविले आहे.

९ आणि १० मे २०२५ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारत, भूतान आणि नेपाळ यांसारख्या विविध देशांतील सुमारे ८५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. शोतोकान कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या ५८ विद्यार्थ्यांच्या संघात ईश्वरीने चमकदार खेळ दाखवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

ईश्वरीच्या या दैदिप्यमान यशाने शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. ईश्वरीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालकमंत्री उदय सामंत, आ. किरण सामंत, श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र सामंत, संचालिका स्वरूपा सामंत व सर्व समिती पदाधिकारी, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील उज्वल शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 13/May/2025