जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत संगमेश्वरातील दादासाहेब सरफरे विद्यालयाचे यश

देवरुख : रत्नागिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय १४ वर्षे वयोगट मुलगे कबड्डी स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय शिवणे बुरंबीच्या संघाने विजेतेपद पटकावले. हा संघ विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

तसेच विभागीय निवड चाचणी साठी १७ वर्षांखालील मुलगे कबड्डी संघासाठी यश मंगेश देवळे, १९ वर्षांखालील मुली कबड्डी संघासाठी समृद्धी सुरेश पातेरे हे विद्यालयातील खेळाडू पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक महावीर साठे, प्रशिक्षक सहायक शिक्षक सुहास पाब्ये, सुरेंद्र कुळ्ये, सूरज जाधव, सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अशोक सरफरे, उपाध्यक्ष राजाराम गर्दे, आणि संस्था पदाधिकारी, संचालक, शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 11/Oct/2024