◼️ रोटरी स्कूलच्या 22 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण तर तब्बल 50 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
◼️ देशात तृतीय कु. अनिषा पालकर (99.60 % ) गुण, देशात पाचवे कु. श्रावणी प्रसाद पोळ व कु. चिन्मय रविंद्र ठाकरे (99.20 %), प्रशालेत तृतीय कु. अनुष्का संतोष खाडे (98.60 %)
◼️ सी. बी. एस. ई. बोर्डाच्या इ. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 13, आयटी विषयात 5, इंग्रजी विषयात 4, गणित विषयात 2, विज्ञान, संस्कृत व पेंटिंग विषयात 1 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले
खेड – ( प्रतिनिधी ) : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मधील सी. बी. एस. ई. इ. 10 वी बोर्ड परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान सुयश प्राप्त केले.
या निकालामध्ये कु. अनिषा पालकर हिने (99.60 %) गुण मिळवत देशात तृतीय येण्याचा बहुमान मिळविला तर कु. श्रावणी प्रसाद पोळ व कु. चिन्मय रविंद्र ठाकरे यांनी (99.20 %) गुण मिळवत देशात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला तसेच कु. अनुष्का संतोष खाडे हिने (98.60 %) गुण प्राप्त करून प्रशालेत तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे.
कु. अनिषा पालकर, कु. चिन्मयी मेंढे, कु. अनुष्का सगरे व कु. सई चाळके यांनी इंग्रजी विषयामध्ये 100 पैकी 100 गुण, कु. अनिशा पालकर, कु. श्रावणी पोळ, कु. अनुष्का खाडे, कु. सिध्दी चव्हाण, कु. जागृती देवळेकर, कु. जान्हवी देवळेकर, कु. तनिष्का शिर्के, कु. शार्वेय बारटक्के, कु. पार्थ नार्वेकर, कु. संचित माने, कु. तिर्था सकपाळ, कु. श्रावणी आरेकर व कु. गार्गी कोराने यांनी मराठी विषयामध्ये 100 पैकी 100 गुण, कु. चिन्मय ठाकरे याने संस्कृत व विज्ञान विषयांत 100 पैकी 100 गुण, कु. अनिषा पालकर व कु. श्रावणी पोळ यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण तसेच कु. श्रावणी पोळ, कु. चिन्मय ठाकरे, कु. अनुष्का खाडे, कु. मोनिष शेठ, कु. वेदांती भोजने यांनी आयटी विषयामध्ये 100 पैकी 100 गुण तसेच कु. संचित माने याने पेंटिंग विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळवण्याची परंपरा कायम राखली आहे.
95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकूण 22 विद्यार्थ्यांमध्ये कु. अनिषा पालकर (99.60 %), कु. श्रावणी पोळ (99.20 %), कु. चिन्मय ठाकरे (99.20 %), कु. अनुष्का खाडे (98.60 %), कु. अथर्व रोडगे (97.40 %), कु. चिन्मयी मेंढे (97 %), कु. नवरूप सिंग (96.80ः), कु. प्रांजल नावाडकर (96.60 %), कु. मोनिश शेठ (96.60 %), कु. सिध्दी चव्हाण (96ः), कु. जागृती देवळेकर (96 %), कु. जान्हवी देवळेकर (96 %), कु. तनिष्का शिर्के (96 %), कु. तन्मय वीरकर (95.80 %), कु. शार्वेय बारटक्के (95.60 %), कु. पार्थ नार्वेकर (95.60 %), कु. वैष्णवी (95.60 %), कु. जितल बामणे (95.20 %), कु. अनुष्का सगरे (95.20 %), कु. संचित माने (95 %), कु. उझैर जुवळे (94.80 %) व कु. वेदांती भोजने (94.80 %) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. एंजल सिन्हा (94 %), कु. आर्णा साडविलकर (93.80 %), कु. आहनिक दळी (93.80 %), कु. अंकित पटेल (93.80 %), कु. इच्छा लटके (93.80 %), कु. तिर्था सकपाळ (93.40 %), कु. सई चाळके (93.40ः), कु. सार्थक यादव (93.40 %), कु. सार्थक राठोड (93.20 %), कु. ओम जंगम (92.40 %), कु. प्रेम शिंदे (92.40 %), कु. श्रावणी आरेकर (92.20 %), कु. सार्थक भोसले (92.20 %), कु. गार्गी कोराने (92.20 %), कु. तेजस वळवी (92 %), कु. किरण बालिगा (91.80 %), कु. पार्थ कान्हेकर (91.20 %), कु. स्वरूप पाटील (91 %), कु. प्रेम कदम (91 %), कु. क्षितिज कळझुणकर (91 % ), कु. आर्यन पाटील (90.80 %), कु. मधुरा बेलोसे (90.60 %), कु. पूर्वा लढ्ढा (90.60 %), कु. शर्वरी गोफणे (90 % ), कु. आर्या पिंपळकर (90 %), कु. अर्थ पाटणे (89.80 % ) व कु. श्रेयस मोरे (89.60 %) या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
रोटरी स्कूलच्या 22 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण तर तब्बल 50 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
वरील विद्यार्थ्यांना दहावीच्या सर्व विषय शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दहावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 14-05-2025














