राजापूर : कोदवली येथे दोन कारचा समोरासमोर अपघात

राजापूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोदवली येथील गुरुमाऊली हॉटेलजवळ स्विफ्ट कार आणि इर्टिगा यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही वाहनातील प्रवासी जखमी झाले. ही घटना १२ मे रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, एका गाडीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश देऊ पेडणेकर (वय ४१, रा. डोंबिवली) हे त्यांच्या स्विफ्ट कार (एमएच-०५/डीएस-१६८५) मधून कुटुंबातील सदस्यांना घेऊन डोंबिवलीकडे जात होते. त्याचवेळी आरोपी अनिल प्रल्हाद केंद्रे (रा. दिवा, ठाणे) हा त्याच्या मारुती एर्टिगा गाडीने (एमएच-०४/एलवाय-१०१०) मुंबईच्या दिशेने समोरून येत होता. कोदवली येथे रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता अनिल केंद्रे याने निष्काळजीपणे आणि वेगात गाडी चालवल्याने त्याची गाडी फिर्यादीच्या गाडीला समोरून धडकली.

या अपघातात फिर्यादीच्या गाडीतील काही सदस्यांना किरकोळ दुखापत झाली, तसेच दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. फिर्यादी नरेश पेडणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अनिल केंद्रे याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला.

राजापूर पोलिसांनी आरोपी अनिल प्रल्हाद केंद्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 14/May/2025