◼️ कु. केवल खापरे (95.40 %) प्रशालेत प्रथम, कु. सोनम महाले (94.80 %) प्रशालेत द्वितीय तर कु. सेजल पेडणेकर ( 94.20 %) गुण मिळवून प्रशालेत तृतीय.
खेड : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील सी. बी. एस. ई. इयत्ता 12 वी बोर्डाच्या विज्ञान शाखेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह आपल्या शाळेच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यामध्ये कु. केवल खापरे (95.40 %) प्रशालेत प्रथम, कु. सोनम महाले (94.80 %) प्रशालेत द्वितीय तर कु. सेजल पेडणेकर ( 94.20 %) गुण मिळवून प्रशालेत तृतीय येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
याचबरोबर 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. पियुष घुगरे (93.80 %), कु. आश्लेषा देवधर (93.40 %), कु. सृष्टी भोजने (93 %), कु. अन्वयी तांबे (92.80 %), कु. हानिया देसाई ( 91.20 %), कु. वरद थोरात ( 91 %), कु. ओम जैन (90.60 %), कु. श्रीदुल भांड (90.60 %), कु. मानस राऊल (90.60 %), कु. रोशनी आंजर्लेकर (90.40 %), कु. नील लिमये (90.20 %), कु. तीर्था वैद्य (89.80 %) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तसेच 32 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. तर 69 विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून सुयश मिळविले आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:51 AM 15/May/2025













