रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठी १० जूनपर्यत पुरेल इतका आहे, मात्र उच्चतम तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे.
नागरिकांनी गैरसोय होऊ नये यासाठी सध्या तरी आठवड्यानून एकदाच दर सोमवारी पाणी कपात सुरु असल्याचे रत्नागिरी पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
शहराला दररोज १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज दीड तास पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता, मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवेगळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला करण्यात येत होता.
मात्र यावर्षी धराणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवेळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो. उपलब्ध साठा पाहून कपातीचा निर्णय घेण्यात येईल, मात्र कपात मोठ्या प्रमाणावर केली जाणार नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. पाणी सोडण्यासाठी विविध प्रभागात २१ लाइनमन कार्यरत आहेत. १५ जण देखभाल दुरुस्तीचे काम पहात आहेत. शहरात अद्याप दीड तास पाणी पुरवठा केला जात आहे. फक्त सोमवारी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे.
मॉन्सून लांबल्यास पाण्याची कपात विचाराधीन मॉन्सून लांबल्यास नागरिकांना पाण्याची झळ बसू नये, यासाठी सध्याच्या पाणीपुरवठ्यात दहा मिनिटांची कपात करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. –वैभव गारवे, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 15/May/2025














