रत्नागिरी : शहरातील तांबट आळी येथे अज्ञात कारणातून विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला.
राखी अजय पवार (४४, रा. तांबट आळी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने काही दिवसांपूर्वी राहत्या घरी अज्ञात कारणातून हेरबीझाईड हे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिला प्रथम जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्या महिलेला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवार, ६ मे रोजी सकाळी ७.१५ वा. सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 16/May/2025












