चिपळूण : खांडोत्री येथे आढळला कुजलेला मृतदेह

चिपळूण : तालुक्यातील मौजे खांडोत्री ते वहाळकडे जाणाऱ्या पायवाटेवर चंडीभाई टेप येथील बरगळीच्या झाडीजवळ एका अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत आढळून आले. ही घटना दि. १४ मे, २०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजेपूर्वी उघडकीस आली.

खांडोत्री गावाचे पोलीस पाटील हे त्या दिवशी घटनास्थळावरून जात असताना त्यांना दुर्गंधी जाणवली. पाहणी केली असता त्यांना एका अंदाजे ६० वर्षीय अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत दिसले. त्यांनी तातडीने सावर्डे पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 16/May/2025