खेड : तालुक्यातील फुरुस पाटील वाडी येथील विलास देवलिंग जंगम या ६४ वर्षे वृद्धाचा उजव्या पायास विंचू चावल्याने उपचारा दरम्यान कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात १७ मे रोजी सकाळी ११.३० वाजता मृत्यू झाला.
खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास जंगम यांना त्यांच्या राहत्या घरी १६ मे रोजी सायंकाळी ७. ३० वाजता फाटी फोडत असताना त्यांच्या उजव्या विंचू चावल्याने त्यांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र फुरुस येथे दाखल केले तेथून त्यांना अधिक उपचाराकरिता कळंबनी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 20/May/2025














