खेड : जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करणाऱ्या धंद्यावर धाड

खेड : तालुक्यातील तिसंगी अळूचा खोड येथील जंगलमय भागात येथील पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या धंद्यावर धाड टाकून १ लाख ३४ हजार ५०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित अनंत भोसले वय ३८ असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे ही कारवाई १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही अळूचा खोड जंगलमय भागात अजित अनंत भोसले ३८ यांनी आपल्या ताब्यात गैर कायदा गावठी दारू बनवण्याकरिता लागणारे साहित्य जवळ बाळगले व गावठी हातभट्टीची दारू गाळी त असताना मिळून आला.

त्याच्याकडे एकूण मिळालेल्या १ लाख ३४ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालामध्ये २५ हजार रुपयांची गुळ नवसागर मिश्रित ५०० लिटर तयार कुजके रसायन टाकीसह तसेच २ हजार लिटर १ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचे गूळ नवसागर मिश्रित तयार केलेले कुचके रसायन टाकीसह आणि ७ हजार रुपये किमतीची ७० लिटर गावठी हातभट्टीची दारू असा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 20/May/2025