मुलांसाठी आंबे आणण्यासाठी गेलेल्या प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : मुलांसाठी आंबे आणण्यासाठी गेलेला प्रौढ घरी परतला नाही. शोध शोध केली असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. पुर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय विश्राम पेजे (४२, रा. शिवार आंबेरे, जाकादेवी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवार १८ मे रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वा. सुमारास शिवार आंबेरे येथील चिंचबाऊल येथे आंब्याच्या झाड येथे घडली.

संजय पेजे हे रविवारी दुपारी बारा वाजता मुलांना आंबे आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. दुपारी साडेतीन पर्यंत घरी परत न आल्याने घरातील माणसांनी त्याची शोधाशोध केली असता शिवार आंबेरे-चिंचबाऊल येथे आंब्याचे झाडाच्या फांदीला पांढऱ्या ओढणीने गळफास लावल्याने लोंबकळत असलेल्या स्थितीत आढळला. या प्रकरणी नातेवाईकांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 20/May/2025