मुंढे तर्फे सावर्डे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे आ. शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

सावर्डे : मुंढे तर्फे सावर्डे ग्रामस्थांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये विकासाच्या नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. या शानदार सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये दत्ताशेठ गुजर, महेंद्र सुर्वे, योगेश मोरे, विजय भुवड, प्रमोद डिके, संजय कदम, रविंद्र साळुंखे, सचिन मोरे, दिलीप मोरे, रामचंद्र चव्हाण, साक्षी साळुंखे, लक्ष्मण येडगे, मनिषा मोरे, अनन्या चव्हाण, मानसी काणेकर, स्वाती कांबळे, रणवीर मोरे, संतोष निकम आणि ज्येष्ठ जमीनदार शांताराम चव्हाण यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

याप्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम यांनी ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली आणि गावाच्या विकासासाठी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, “ग्रामविकास केवळ शासकीय योजनांवर आधारित नसतो, तर तो गावकऱ्यांच्या सक्रिय सहभाग आणि एकजुटीमुळे साधता येतो.”

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात आले होते, ज्यामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण होते. या नूतन इमारतीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अधिक सुलभता येईल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 20/May/2025