देवरुख : पाटगाव येथील रस्त्याची चाळण

देवरुख : देवरुख रत्नागिरी मार्गाला जोडणाऱ्या पाटगाव बौद्धवाडी ते गवंडीवाडी-गोपाळवाडी रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ग्रामस्थ, वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रत्नागिरीकडे जाण्यासाठी पाटगाव बौद्धवाडी ते गवंडीवाडी ते तांबे नर्सरी हा महत्त्वाचा मार्ग आहे. जवळचा मार्ग असल्याने वाहनांची सदैव गर्दी असते. त्यामुळे हा रस्ता वेळेत दुरुस्त करावा, अशी अपेक्षा केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 20/May/2025