पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा भाजपकडून विविध कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 300 वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांना माहिती होण्यासाठी मोठ्या स्तरावर हा कार्यक्रम राबवला जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्ष कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत व अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी जिल्हा कार्यालयात कार्यशाळा घेण्यात आली.

बैठकीमध्ये माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नीलेश आखाडे, सौ. कवितके, सौ. रसाळ, सर्व मंडल अध्यक्ष, आघाडी, प्रकोष्ठ जिल्हा संयोजक सर्व पदाधिकारी महिला व पुरुष उपस्थित होते.

श्री. जठार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्यान केले. राजेश सावंत यांनी सर्व कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले. कोणकोणते कार्यक्रम जिल्हाभरात करायचे, याबाबत नियोजन करण्यात आले. नीलेश आखाडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनकथा सांगितली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 20-05-2025