Ratnagiri : वादळी पावसामुळे नौका बंदरांच्या आश्रयाला

रत्नागिरी : मंगळवारी दुपार नंतर वादळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. मुसळधार पावसाचा इशारा मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना यापूर्वीच देण्यात आला होता. मच्छीमारांनी देखील त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

मंगळवारी दुपारी पावसाचे वातावरण तयार होताच अनेक नौकांनी प्रमुख बंदरांचा आश्रय घेतला. जयगड, हर्णे, मिरकरवाडा, पावस, नाटे, दाभोळ या ठिकाणी मासेमारी नौकानी मोठी गर्दी केली होती. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने मासेमारी दिवस ठप्पच राहण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 21-05-2025