राजापूरात गडगडाटासह पाऊस

राजापूर : तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. दुपारच्यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत सुमारे तासाभरापेक्षा जास्त काळ पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली. अनेकांना पावसामध्ये भिजतच घर गाठावे लागले. गेल्या काही दिवसांपासून विजेचा सुरू असलेला लपंडाव मंगळवारी दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर कायम राहीला.

मंगळवारी (ता. २०) दुपारी ढगाळ वातावरण तयार होऊन सोसाट्याचे वारे सुरू झाले. काहीवेळातच विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाटही सुरू झाला. त्याच्यासोबत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासाभरापेक्षा जास्त काळ पावसाचा जोर राहिला होता. त्यामध्ये सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. दुपारच्यावेळी अचानक आलेल्या पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडाली.

दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना छत्रीअभावी भर पावसामध्ये भिजतच घर गाठावे लागले. जोरदार बरसलेल्या पावसामुळे तीव्र उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 21/May/2025