चिपळूणमध्ये आज तिरंगा सिंदूर विजय यात्रा

चिपळूण : चिपळूणमध्ये बुधवारी, दि. २१ मे रोजी तिरंगा सिंदूर विजय मोटर सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही यात्रा संध्याकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकातून या्रा सुरू होणार असून बहादूरशेख नाका, मार्कंडी, चिंच नाका, बाजारपेठमार्गे नाईक पूल, गोवळकोट रोड, देवी करंजेश्वरी कमानीपासून डाव्या बाजूने उक्ताडमार्गे भेंडीनाका, बँक, जुना स्टँड, चिंच नाकामार्गे शिवस्मारक इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चौपाटी या मार्गाने यात्रा जाईल.

तेथे युद्धात शहीद झालेल्या सैनिक व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या वेळी माजी सैनिक मनोगत व्यक्त करतील.

अधिकाधिक सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 21-05-2025