रत्नागिरी : गस्तीमध्ये एलईडी नौका सापडली नाही; ‘रामभद्रा’ मार्फत चाचपणी

रत्नागिरी : पावसाळी मासेमारीबंदीच्या पार्श्वभूमीवर पर्ससिननेट मासेमारी करणाऱ्या बहुसंख्य नौकांनी मासेमारी बंद केली आहे. मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असताना एलईडीसह राज्याच्या सागरीक्षेत्रात अवैध मासेमारी सुरू असल्याच्या तक्रारी मत्स्य विभागाकडे येत आहेत.

त्यावरून सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या रामभद्रा गस्ती नौकेने प्रत्येकवेळी तिथे खात्री केली; परंतु तिथे कोणतीही मासेमारी नौक आढळून आले नाही. याला सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजारा दिला आहे.

पावसाळी मासेमारी बंदी ३१ मेपासून सुरू होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पर्ससिननेट मासेमारी नौका बंदरात शाकारल्या जाऊ लागल्या आहेत.

बहुसंख्य नौकांची मासेमारी बंद झालेली असतानाही गेल्या काही दिवसांपासून समुद्रातील नौकांवरील लाईटचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करून ते मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. तसेच त्या नौकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार मत्स्य आयुक्तांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या पथकाला त्या तक्रारीनुसार कारवाई करण्याची सूचना केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 21/May/2025