पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सकारात्मक दृष्टीने काम करणारे नेतृत्त्व : जयश्री गायकवाड

रत्नागिरी : पोलिस अधीक्षकांनी नेहमीच सकारात्मक दृष्टीने काम केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कुणा अधिकारी, कर्मचारी यांच्यावर न रागवता किंवा कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांच्याकडून चांगले कसे काम करून घेता येईल हे त्यांनी पाहिले. वेगळ्या पद्धतीने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडून पाहता येते, अशी भावना अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी व्यक्त केली.

कुलकर्णी यांनी केलेल्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले. शांत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून कुलकर्णी यांनी आपली ओळख निर्माण केली होती. सामाजिक समतोल ढासळू नये यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे मत चिपळूण येथील निराधार फाउंडेशनचे नाझीमभाई अफवारे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी जिल्ह्यात काम करताना येथील जनतेशी, संस्कृतीशी एकरूप झाल्याने मला चांगले काम करता आले. कोकणी लोकांच्या मनात श्रद्धाभाव असल्यानेच येथे गुन्हेगारी कमी आहे. आदर्शवत ही संस्कृती कायम राखली पाहिजे, अशा भावना मावळते पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 21/May/2025