रत्नागिरी : घरकुल लाभार्थ्यांना ३१ मेपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वेक्षण मोहिमेला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्वेक्षणाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत नवीन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

त्यामुळे घरकुल घेऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी किंवा ग्रामपंचायतीत संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ‘आवास प्लस २०२४’ या मोबाईल अॅपद्वारेही लाभार्थी माहिती भरू शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 21/May/2025