चिपळूण : येथील नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील नाले व गटार सफाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. पोकलेन, जेसीबी तसेच मनुष्यबळाआधारे स्वच्छता केली जात आहे.
शहरात १७ किलोमीटर लांबीचे ४३ नाले, परे आहेत. तसेच लहान-मोठी ७० गटारे आहेत. गटारांची साफसफाई नेहमीच केली जाते. मात्र, पावसाळ्यात डोंगर भागासह अन्य ठिकाणाहून येणारे पाणी शहरात न अडता ते थेट वाशिष्ठी व शिवनदीत वाहून जावे यासाठी नाल्यांच्या व त्याचबरोबर गटारांच्या सफाईचे काम मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, सुजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यातच सुरू झाले. मोठ्या नाल्यांची ८० टक्के सफाई पूर्ण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 21/May/2025













