खेड : यावर्षी झालेल्या मंथन परीक्षेत इयत्ता तिसरीमध्ये २६८ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या चिन्मयी श्रीकृष्ण खांडेकर हिचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेड परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. चिन्मयी ही शिक्षक समिती जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर यांची कन्या आहे.
गेल्या वर्षी चिन्मयीने याच परीक्षेत विभागात पाचवा क्रमांक मिळवला होता. तसेच, यावर्षी बीडीएस परीक्षेतही ९० गुण मिळवून तिने कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या कौतुकास्पद यशाबद्दल शिक्षक समितीने तिचा गौरव केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, खेड शाखेचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर यांच्यासह राजेश भागणे, सतीश गजमल, दीपक कांबळे, संतोष तांबट, भागोजी कडव आदी पदाधिकारी उपस्थित होते. चिन्मयीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 21/May/2025













