लांजा : तालुक्यातील रिंगणे तसेच पाली भागात गेल्या १५ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे मोबाइलवरून संपर्क करणे कठीण झाले आहे.
दुर्गम भागात राहणाऱ्या येथील ग्रामस्थांना मुंबई तसेच ग्रामीण शहरात आपल्या नातेवाइकांना तालुक्याच्या ठिकाणी संपर्क करणे अवघड झाले आहे. या भागातील बहुतांश लोकांकडे बीएसएनएल सिम कार्ड आहे. मात्र, ही सेवा कोलमडल्याने इथल्या जनतेची गैरसोय झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 21/May/2025













