रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय गुरुनाथ सावंत (२९) व कय्युम मुबारक खान (२६) अशी या संशयित तरुणांची नावे आहेत.
ही घटना रविवारी (ता. १८) रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाजूला निदर्शनास आली. स्टेडियमच्या बाजूला आडोशाला बसून हे दोन तरुण मद्यपान करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणी कॉन्स्टेबल भालचंद्र मयेकर व अनुप पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तन्मय गुरुनाथ सावंत आणि कय्युम मुबारक खान या दोन संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 21/May/2025













