चिपळूण शिक्षण विभागाने केलीय १६ हजार पुस्तकांची शासनाकडे मागणी

चिपळूण : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांसाठी चिपळुणातील शिक्षण विभागाने १६ हजार पुस्तकांची शासनाकडे मागणी केली आहे. यात मराठीप्रमाणे उर्दू माध्यमाचाही समावेश आहे.

नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असला, तरी मे अखेरीस किंवा जूनच्या प्रारंभी ही पुस्तके शिक्षण विभागात दाखल होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 21/May/2025