Maharashtra Weather 2024 : जिल्ह्यात मान्सून च्या सरी, वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट

मान्सून जाता-जाता महाराष्ट्रातील 'या' भागांत जोरदार बरसणार
मान्सून जाता-जाता महाराष्ट्रातील 'या' भागांत जोरदार बरसणार

रत्नागिरी : Maharashtra Weather 2024 जिल्ह्यात काल रात्रीपासूनच मान्सून च्या सरी पडल्याचे दिसतंय. काल रात्री पासून जिल्ह्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पाहायला मिळतोय. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये तर प्रचंड पाऊस पडतोय.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरांतही आज प्रचंड वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह प्रचंड पाऊस पडला. तसेच मुंबईत आताही मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे ऑफिसचे कामकाज पूर्ण करुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं

कोल्हापुरातही परतीच्या मान्सून ने दाणादाण Maharashtra Weather 2024

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सकाळपासून उन्हाचा तडाका जाणवत होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास आलेल्या या पावसामुळे वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पतीचा पाऊस कोसळत आहे. याचा शेतीच्या कामावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची काढणी आणि मळणी कोळंबली आहे. तर जिल्ह्यातील भात पिकाला देखील या पावसाचा मोठा फटका बसतोय.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. महाराष्ट्रातील रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरांतही आज प्रचंड वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह प्रचंड पाऊस पडला. तसेच मुंबईत आताही मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे ऑफिसचे कामकाज पूर्ण करुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं

Maharashtra Weather News : ऑक्टोबर हीटमुळं उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असतानाच एकाएकी राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाटचं सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं नव्यानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसानं क्षणिक उघडीप दिली असली तरीही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा राज्यावर काळ्या ढगांचं सावट पाहायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे. 

पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं एक तीव्र क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असल्यामुळं पुढील तीन दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय राज्याच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर जास्त रहाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Maharashtra Weather 2024
Maharashtra Weather 2024

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात मंगळवारपासून कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याची वाटचाल वायव्य दिशेने होताना दिसत आहे. येत्या काळात हे वारे आणखी तीव्र होणार असून, अरबी समुद्रात त्यामुळं कमी दाबाचं क्षेत्र अधिक प्रभावी राहणार आहे. 

मुंबईपासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र इथं राहणार आहे. ज्यामुळं पावसानं अद्यापही पाठ सोडलीच नाहीय असं म्हणणं गैर ठरणार नाही. सकाळ- दुपारी उन्हाचा तडाखा आणि सूर्य मावळतीला जाताना सुटणारा सोसाट्याचा वारा, त्यासह येणारा वादळी पाऊस या विचित्र हवामानामुळं नागरिकांना कैक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान Maharashtra Weather 2024

पालघर जिल्ह्यात देखील वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे काढणीसाठी आलेल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय. येथे अजूनही पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सकाळपासून उन्हाचा तडाका जाणवत होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास आलेल्या या पावसामुळे वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पतीचा पाऊस कोसळत आहे. याचा शेतीच्या कामावर देखील परिणाम होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची काढणी आणि मळणी कोळंबली आहे. तर जिल्ह्यातील भात पिकाला देखील या पावसाचा मोठा फटका बसतोय.

अकोल्यात देखील जोरदार पाऊस बरसत आहे. मागील 24 तासात येथे मुसळधार पावसाची नोंद झाली. जिल्हातल्या मुर्तीजापूर तालुक्यात देखील विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून शेतात काम करणाऱ्या एका 23 वर्षीय युवकाचा मृत्यू तर एक महिला जखमी झाली. (Maharashtra Weather Update )