चिपळूण : कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतीबंधामध्ये कृषी सहायकांच्या पदोन्नतीची कुंठीत अवस्था दूर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारपासून संपूर्ण कामकाजावर कृषी सहायकांनी बहिष्कार टाकून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
सध्या कृषी सहायकांची एकूण ११,५२७ पदे अस्तित्वात असून, कृषी पर्यवेक्षकांची ७०० पदे मंजूर आहेत. त्यामुळे कृषी सहायकांना सेवेची २० ते २५ वर्षे झाल्यानंतरही पदोन्नती मिळत नाही. कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणींसंदर्भात संघटनेने वेळोवेळी शासनदरबारी निवेदने देऊन व बैठकांमध्ये अडचणी सोडविण्याची मागणी केली आहे.
कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४ : १ याप्रमाणे करण्यात यावे, कृषी सहायक संवर्गाचे पदनाम बदलून सहाय कृषी अधिकारी करण्यात यावे. कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सहायकांना नियमित कृषी सहायक पदाचे आदेश द्यावेत, अशा विविध मागण्यांबाबत आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी संपूर्ण राज्यातील कृषी सहायक यांनी कृषी विभागाच्या व इतर सर्व कामकाजावर बहिष्कार टाकला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 21/May/2025













