चिपळूण : भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू

चिपळूण : भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिपळूणमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य प्रीतम शेट्ये यांनी केले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिपळुण येथे वीजतंत्री, तारतंत्री, जोडारी, कातारी, संधाता, यां. मोटार गाडी, यां. डिझेल, ओओसीपी, आयएमसीपी, एमएमसीपी हे व्यवसाय शिकविले जातात., तारतंत्री-२०, जोडारी -२०, कातारी -२०, संधाता – ४०, यां. मोटारगाडी २४, यां. डिझेल-४८, ओओसीपी-४८, आयएमसीपी-२०, एमएमसीपी -४० इतकी आहे.

यामध्ये तारतंत्री व संधाता करिता शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण आहे व इतर सर्व व्यवसायांकरिता दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. तसेच व्यवसायाचा कालावधी संधाता व यां. डिझेल, या व्यवसायाकरिता १ वर्षाचा आहे व इतर सर्व व्यवसायांकरिता २ वर्षाचा कालावधी आहे.

भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

प्रवेशासंबंधी माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया समन्वयक राजेंद्र चव्हाण (8888070870) यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 21/May/2025