रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील एका चिकन सेंटरमध्ये रंजन गजानन बागकर (६७, मूळ रा. करसगाव, ता. दापोली, सध्या रा. वाटद खंडाळा, ता. रत्नागिरी) या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जयगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रंजन बागकर हे खबर देणाऱ्यांच्या चिकन सेंटरमध्ये मागील सात ते आठ दिवसांपासून राहत होते. १९ मे रोजी दुपारी चिकन सेंटरमध्ये जाऊन त्यांना आवाज दिला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तात्काळ त्यांना उपचारासाठी वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रंजन बागकर यांना मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 21/May/2025













