रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी : सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात

रत्नागिरी, 21 मे 2025: रत्नागिरी जिल्ह्यात आज (21 मे 2025) पावसाने जोरदार हजेरी लावली असून, जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण पर्जन्यमान 397.52 मिमी इतके नोंदवले गेले असून, सरासरी पाऊस 44.17 मिमी राहिला आहे.

जिल्ह्याच्या रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 74.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात 60.75 मिमी पाऊस पडला. राजापूर तालुक्यात 44.62 मिमी, खेड येथे 43.42 मिमी, लांजा येथे 38.80 मिमी, गुहागर येथे 38.20 मिमी, दापोली येथे 34.85 मिमी, चिपळून येथे 33.88 मिमी, तर मंडणगड तालुक्यात 29.00 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, काही भागात सखल क्षेत्रात पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर पाहता, येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील पर्जन्यमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:18 21-05-2025