चिपळुणात महामार्गावरील पाणी शिरले घरात

चिपळूण : चिपळुणात पहिल्याच पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालयासह शिवाजीनगर बसस्थानकाजवळ रस्त्यावर पाणी साचले आणि काही घरांतही शिरले.

या पार्श्वभूमीवर पालिकेचा स्वच्छता व आरोग्यविभाग सतर्क झाला असून, पावसाचे पाणी साचू नये यासाठी ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. चिपळुणात गेले तीन दिवस वळवाच्या पावसाने जोर धरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 22/May/2025