संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे सुर्वे कोंड सुतारवाडी येथे चोरट्याने बंद घर फोडून ४२ हजार रुपयांची चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीकांत सीताराम पेडांमकर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्री. पेडामकर यांचे घर १९ मे पासून बंद होते. हीच संधी साधून चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे दार उचकटून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेनंतर पेडांमकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 22/May/2025













